विरारमध्ये आपल्या मित्राला घेण्यासाठी गेलेल्या तरुणा एका वाहनाला धक्का लागला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.विरार दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. लोखंडाच्या सळईने डोक्यात वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून सौरभ मिश्रा (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाच आरोपींना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.नालासोपारा शेरा सर्कल परिसरात राहणारा पंचवीस वर्षाचा तरुण सौरभ मिश्रा व त्याचे मित्र त्यांचा मित्र विवेक गुप्ता याचा सोमवारी वाढदिवस असल्याने मध्यरात्री केक कापून सेलिब्रेशन करणार होते. सचिन शर्मा, विवेक गुप्ता, सोनू खान आणि सौरभ मिश्रा हे सर्व मित्र त्यांचा एक मित्र नालासोपारा येथील संतोषभवन परिसरात राहत असलेल्या मित्राला दुचाकीवरून घेण्यासाठी जात होते. मोचीपाडा परिसरात अजय चौहान (वय 20) आणि कौशिक चौहान (वय 21) यांना सौरभच्या बुलेट दुचाकीचा धक्का त्यांना लागला.










