तरुणाने सायकलने धडक दिल्यानंतर रेखा कोंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कोंडेंनी हेल्पलाईनवर संपर्क केला असता लवकर मदत न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.पुण्यात स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण चक्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना अज्ञात व्यक्तीने सायकलने धडक दिली आणि त्यानंतर शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. आम्हा महिलांना परवानगी द्या, की एखादं छोटंसं हत्यार किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वाघनखं बाळगण्याची परवानगी द्या, म्हणजे आम्हाला पोलिसांचीही गरज नाही, असं रेखा कोंडे म्हणाल्या.तरुणाने सायकलने धडक दिल्यानंतर रेखा कोंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कोंडेंनी हेल्पलाईनवर संपर्क केला असता लवकर मदत न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर चौकात एक पोलीस कर्मचारी उभा होता, त्यांच्याकडे मदत मागितली असता, त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार करा, अस सांगितल्याचा आरोपही कोंडेंनी केला आहे.










