विद्यार्थ्यांना घेऊन टाटा मॅजिक निघाली, पण वाटेत अनर्थ घडला; आयशरच्या धडकेत विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत.

शहादा-शिरपूर मार्गावर भीषण अपघात घडला आहे. येथील तोरखेडा फाट्याच्या पुढील नाल्यावर असलेल्या फरशीवरुन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिकला मागून आलेल्या भरधाव आयशरने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.शहादा-शिरपूर मार्गावर भीषण अपघात घडला आहे. येथील तोरखेडा फाट्याच्या पुढील नाल्यावर असलेल्या फरशीवरुन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिकला मागून आलेल्या भरधाव आयशरने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. ३ मार्चला सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घडना घडली. या अपघातात एका २३ वर्षीय इंजीनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

जखमींवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा तालुक्यातील तोरखेडा गावच्या शाळकरी मुलांना सोमवारी सकाळी सात वाजता चालक नेहमीप्रमाणे टाटा मॅजिक (क्र.एम. एच.४१ व्ही.००१४)ने घेऊन जात असताना तोरखेडा फाट्याच्या पुढे असलेल्या एका नाल्याजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात शिरपूर येथील इंजीनियरिंग महाविद्यालयात शिकत असलेल्या प्रशांत भगवान घोरपडे (वय २३) रा. तोरखेडा याचा मृत्यू झाला आहे.

आयशरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातात करुणेश प्रकाश पाटील (वय ९), हितेश पंकज चौधरी (वय ९), कशिश कुंभार (वय ९), हर्षल दिनेश वाडीले (वय १२), हर्ष दीपक कुंभार (वय १०), यश दिनेश आभाळे (वय ११), उन्नती परेश ईशी (वय ७) हे सात विद्यार्थी जखमी झाले आहेत. मात्र अपघातानंतर चालक फरार झाला. जखमी विद्यार्थ्यांना शिरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक व गावकरी घटनास्थळी पोहोचले. नातेवाईकांनी रोष व्यक्त केल्यानंतर सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा-शिरपूर रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने. या रस्त्यावर अलीकडे अनेक अपघात घडत आहेत. सोमवारी घडलेल्या या अपघातामुळे शहादा शिरपूर रस्त्याच्या दोघेही बाजूने तीन किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.