रेल्वेत प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, झवेरी बाजारात नेऊन विकायचा, सराईत चोर गजाआड.

कल्याण रेल्वे पोलिसांनी महिला प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महेश धाग नावाच्या आरोपीला अटक केली आहे. धाग हा चोरीचे दागिने झेवरी बाजारातल्या ज्वेलर्सकडे विकायचा, त्यात ज्वेलर्सचे दोन कामगार, नितीन येळे आणि तानाजी माने यांचाही सहभाग होता. तिघांना अटक करून पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला आहे. ही घटना मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीचा एक भाग आहे आणि रेल्वे प्रवाशांना जागरूक राहण्याची गरज अधोरेखित करते.मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढल्या असून चोरी, लूटमारीचे गुन्हेही उघडकीस येत आहेत.

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमध्येही कित्येक वेळा प्रवाशांना चोरट्यांचा फटका बसतो. त्यामुळे प्रवास करणेही दिवसेंदिवस जिकीरीचे होत आहे. दरम्यान रेल्वेतून प्रवास करत असताना महिला प्रवाशांवर लक्ष ठेवून त्यांच्या मौल्यवा वस्तू लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे.कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करून चोरट्याला बेड्या ठोकल्या. महेश धाग असे आरोपी चोराचे नाव आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे रेल्वेतील प्रवाशांचे चोरलेले दागिने तो चोरटा झेवरी बाजारात जाऊन तेथील ज्वेलरीच्या दुकानात विकायचा.

यामध्ये त्या ज्वेलरी दुकानातील दोन कामगारांचाही समावेश असल्याची माहिती उघड झाली. नितीन येळे आणि तानाजी माने अशी दोन कामगारांची नावं असून ते, हे चोरलेले दागिने घ्यायचे,ते विकून आलेले पैसे आरोपी महेशला द्यायचे.तिघांच्या संगतमताने मिळून हा गुन्हा सुरू होता.चोरीच्या या घटेनेत ज्वेलरच्या दुकानाताली कामगारांचाही समावेश असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही बेड्या ठोकत अटक केली. पोलिसांनी त्या तिघांकडून चोरीचे दागिने, मोबाइल आणि काही रोकडही जप्त केल्याची समोर आली आहे. या तिघांनी मिळून अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत याचा तपास रेल्वे क्राईम ब्राँचचे अधिकारी आता करत आहेत. या घटनेने रेल्वे प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.