डॉक्टरने व्यथित होऊन आयुष्याची दोर कापली, मुलीचाही मृतदेह आढळला; कारण ऐकून डोळे पाणावतील.

मध्यप्रदेशातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका होमिओपॅथी डॉक्टरने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर त्यांच्या मुलीचा मृतदेह देखील घरातच मृतदेह आढळला.मध्यप्रदेशातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका होमिओपॅथी डॉक्टरने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर त्यांच्या मुलीचा मृतदेह देखील घरातच आढळला आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन ते पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

धक्कादायक म्हणजे मृतदेहाशेजारी चार पानी सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, ‘ते पत्नीच्या मृत्यूमुळे धक्क्यात होते. तर मुलगी देखील या धक्क्यातून सावरु शकली नाही.’सुसाईड नोटमध्ये असेही लिहले आहे की, त्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात दान करण्यात यावे, या घटनेमुळे साऱ्यांचेच डोळे पाणावले आहेत. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. डॉक्टर हरिकिशन शर्मा आणि मुलगी चित्रा शर्मा या बापलेकीचे मृतदेह घरात सापडले. रविवारी सकाळच्या सुमारास एक रुग्णाने येऊन डॉक्टरांच्या घराचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानी ही गोष्ट पोलिसांना कळवली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दरवाजा उघडला. आत जाताच पहिल्याच खोलीत डॉ. शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर दुसऱ्या खोलीत, त्यांची मुलगी जमिनीवर पडली होती.हरिकिशन यांची मुलगी आणि जावई भोपाळमध्ये राहतात. डॉ. हरिकिशन यांनी सुसाईड नोटमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिले की, ते अनेक आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्याला आरामाची आवश्यकता आहे. असे असले तरी त्यांना आपल्या मुलीचीही काळजी घ्यावी लागते. हे सर्व सहन करणे आता कठीण झाले आहे. यावर त्यांच्या जावयाने सांगितले की, पत्नी आणि मुलाच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे विस्कळीत झाले होते आणि या धक्क्यामुळे चित्राची मानसिक स्थितीही बिघडली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.