सत्तेसाठी घोडेबाजार! अविश्वास ठरावावरुन देवीदास पिंगळेंचा महाजनांवर गंभीर आरोप; प्रत्येकी ५० लाख दिल्याचा दावा.

बाजार समितीतील १८ पैकी १५ संचालकांनी पिंगळेवर अविश्वास दाखल केल्यानंतर त्यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावरच आरोपांची राळ उठविल्याने नाशिकमध्ये पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वादाचा नवा अंक सुरू झाला आहेनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील विद्यमान सभापती देवीदास पिंगळे आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यातील राजकीय वैमनस्य पुन्हा उफाळून आले असून, चुंभळेंनी भाजपच्या मदतीने पिंगळेंना धक्का दिला आहे. बाजार समितीतील १८ पैकी १५ संचालकांनी पिंगळेवर अविश्वास दाखल केल्यानंतर त्यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावरच आरोपांची राळ उठविल्याने नाशिकमध्ये पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वादाचा नवा अंक सुरू झाला आहे.

संचालकांना प्रत्येकी ५० लाख रुपये देऊन फोडले असून, यामागे महाजन असल्याचा गंभीर आरोप पिंगळे यांनी केला.नाशिक बाजार समितीच्या २८ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीत माजी सभापती पिंगळे यांनी १८ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. तर, शिवाजी चुंभळे यांच्या गटाला सहा जागांवर विजय मिळवता आला होता. पिंगळे यांनी चुंभळे गटाचे सहापैकी तीन संचालक फोडून आपल्या गटात ओढून घेतले होते. मात्र, दोन वर्षांतच विरोधी गटाने पिंगळे यांच्या सत्तेला खिंडार पाडत सत्ता हस्तांतरणाचा मार्ग मोकळा केला. बाजार समितीतील १८ संचालकांपैकी १५ जणांनी राजकारण जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे पिंगळेविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. यावरून पिंगळे यांनी मत्री महाजन यांना लक्ष्य केले आहे.पोलिस बंदोबस्तात बाजार समितीच्या संचालकांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. प्रत्येक संचालकास ५० लाख रुपये देऊन फोडले. यामागे महाजन असल्याचा गंभीर आरोप पिंगळे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार असल्याचे पिंगळे म्हणाले.२४ फेब्रुवारी २०२० ला तत्कालीन सभापती शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात १५ विरुद्ध ३ असा अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी चुंभळे यांना सभापतिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्याचा बदला आता चुंभळेंनी घेतला आहे. चुंभळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पंधरा दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर पिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे सदस्य आहेत. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उतरणार की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.

पिंगळे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावून घेत बाजार समितीचे सर्व कामकाज रोखण्याचे आदेश दिले. तसेच, नव्या सभापतींची निवडणूक घेण्यासाठी परिपत्रक काढण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजता नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अविश्वास ठरावावर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर २० मार्चपर्यंत नव्या सभापतीची निवड केली जाण्याची शक्यता आहे.मंत्री गिरीश महाजन यांनी पैशांच्या जोरावर आणि यंत्रणांचा गैरवापर करून बाजार समितीत सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला पन्नास लाख रुपये आणि सिंहस्थात पाच कोटींच्या कामांचे आमिष दाखवण्यात आले. याबाबत अजित पवारांकडे तक्रार करणार आहे. बाजार समितीत वसुली हाच अजेंडा डोक्यात ठेवून पिंगळे यांनी मनमानी पद्धतीने आपला कारभार चालवला. समितीत शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्रास दिला जातो. त्यामुळे संचालकांनी मिळून हा अविश्वास आणला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.