संभाजीनगरकर तब्बल ५४ तास पाण्याविना, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद.

 ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जायकवाडी पंपहाउसजवळ फुटल्याने शहरात ५४ तास पाणीपुरवठा बंद होता. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर सोमवारी दुपारी दोन वाजता पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची अद्याप दुरुस्ती पूर्ण झालेली नसून नंतर पाणीपुरवठा सुरू केला जाईल.जायकवाडी पंपहाउस जवळ फुटलेली ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी दुरुस्त झाल्यावर ५४ तासांनी म्हणजे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरात पाणी आले. तब्बल ५४ तासांनी शहरात पाणी आले. उन्हाळ्याला सुरूवात झालेली असताना आणि धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असताना शहरवासीयांना पाण्याविना ५४ तास राहण्याची वेळ आली. अनेक प्रयत्नांनंतर शेवटी पाणीपुरवठा करण्यात प्रशासनाला यश मिळाले.

जायकवाडी पंपहाउसच्या जवळ शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या आणून ठेवल्या होत्या. या जलवाहिन्या स्थलांतरित केल्याशिवाय फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याबद्दलची माहिती दिली, पण प्राधिकरणाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.रविवारी सायंकाळी प्राधिकरणाचे अधिकारी जलवाहिनी फुटली त्या ठिकाणी आले. प्राधिकरणाचे उपअभियंता वाघ रात्री आठ वाजता आले. त्यांनी दोन हायड्रा बोलावून बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या हटवल्या.

त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. सातशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर नऊशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी वर उचलल्याशिवाय सातशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे शक्य नव्हते. त्यामुळे खोदकाम करुन नऊशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वर उचलण्यात आली. जलवाहिनी उचलल्यावर निर्माण झालेल्या गॅपमधून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि ५४ तासांनी शहरात पाणी आले. सातशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. जलवाहिनी फुटल्याच्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचे उपअभियंता किरण धांडे, मनोज बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.