वाढत्या तापमानातील दिलासा! राज्यातील ३२ प्रमुख धरणांत सरासरीहून अधिक पाणी, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

केंद्रीय जल आयोगाने उन्हाळापूर्व धरणसाठ्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील प्रमुख ३२ धरणांचा समावेश आहे.मार्च महिना नुकताच सुरू झाला असतानाच राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढू लागला आहे. या तापत्या उन्हात सुदैवाने राज्यभरातील ३२ धरणांमध्ये १९ टक्के अधिक पाणीसाठा असल्याचे दिलासादायक चित्र आहे. केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आले आहे.केंद्रीय जल आयोगाने उन्हाळापूर्व धरणसाठ्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील प्रमुख ३२ धरणांचा समावेश आहे.

या ३२ धरणांमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीत क्षमतेच्या ४८ टक्के जलसाठा होता. तर, याच काळातील मागील दहा वर्षांची सरासरी ५४ टक्के आहे. त्या तुलनेत ही ३२ धरणे सध्या ६५ टक्के भरलेली आहेत, अशी माहिती या आकडेवारीतून पुढे आली आहे.या आकडेवारीनुसार, क्षमतेच्या तुलनेत सर्वाधिक ८७ टक्के जलसाठा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात आहे. तर येल्दारी (जि. परभणी), कोयना व उरमोडी (जि. सातार), इसापूर (जि. यवतमाळ), अप्पर वैतरणा व दारणा (जि. नाशिक), अप्पर तापी (जि. जळगाव) या धरणांत ७० ते ८० टक्क्यांदरम्यान जलसाठा आहे. उर्वरित सर्व धरणे ही क्षमतेच्या ५० ते ७० टक्के भरलेली आहेत.

मात्र एकाही धरणांत सध्या तरी ५० टक्क्यांहून कमी जलसाठा नाही.हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे पुण्यासह राज्यातील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून सोमवारी लोहगाव परिसरामध्ये राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तळेगाव, चिंचवड, लवळे भागात पारा ३८ अंशाच्या पुढे गेला होता, तर पुण्यात ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
येत्या आठवड्यात तापमान खाली येणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पहाटे गारवा आणि दुपारी कडाक्याचे ऊन अशी स्थिती होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.