सराईत भामट्यांचा वावर वाढला, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने,मंदिरात, एक ना अनेक कारणे सांगून मुंबईच्या गल्लीबोळात लुटीच्या घटना.

महानगर मुंबईमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांच्या अडचणीचा, त्यांच्या एखाद्या श्रद्धा असलेल्या ठिकाणाच्या नावाचा उल्लेख करुन नागरिकांच्या दागिने आणि एकूणच ऐवजावर डल्ला मारला जातो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती न सांगणे, आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.कुणावरही झटकन विश्वास ठेवण्याच्या मुंबईकरांच्या स्वभावाचा गैरफायदा काही चोरटे घेताना दिसत आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, मंदिरात हार-तुऱ्यांचे कारण सांगून, मोफत धान्यवाटप, साडीवाटप, नाकाबंदी अशी एक ना अनेक कारणे सांगून मुंबईच्या गल्लीबोळात लुटीच्या घटना वाढत आहेत.

अंधेरी एमआयडीसी परिसरात ७१ वर्षीय वृद्धाला एक अनोळखी तरुण भेटला. त्याने येथे कुठे स्वामींचे मंदिर आहे का, अशी विचारणा केली. मंदिर जवळपास नसल्याचे वृद्ध व्यक्तीने सांगताच त्या तरुणाने फुलांचे हार आणि वर्गणी म्हणून काही रक्कम पिशवीतून काढली. मला वेळ नाही तुम्ही हे मंदिरात दान करा आणि त्यापूर्वी गळ्यातील सोन्याची चेन काढून त्याला स्पर्श करा, असे हा तरुण म्हणाला. वृद्ध व्यक्तीने चेन देताच त्याने नोटांभोवती गुंडाळल्याचे भासवून ती लंपास केली. अन्य एका घटनेत एका तरुणीला दादर परिसरातील एका कार्यालयात मुलाखतीसाठी जायचे होते. तिने एका अनोळखी तरुणाला पत्ता विचारला. त्याने पत्ता सांगितला व तरुणी मुलाखत देऊन येईपर्यंत हा तरुण इमारतीखाली उभा होता. ती परतताच त्याने पुन्हा तिच्यासोबत बोलणे सुरू केले. पत्ता सांगितल्याने तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. बोलण्यात गुंतवून तो तिच्या गळ्यातील चेन घेऊन गायब झाला.

ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या गर्दीत गंडा घालण्याचे प्रकारही वरचेवर घडतात. बोरिवली येथील एका बँकेत ७० वर्षीय महिला रोख रक्कम जमा करण्यासाठी रांगेत उभी होती. लांबलचक रांगेत वृद्धेला पाहून मदतीसाठी एक तरुण पुढे आला. आजी रांगेत कशाला उभ्या आहात? बँकेच्या बाजूला एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्याचे मशिन आहे. मी पैसे भरून देतो असे सांगून तो शेजारी असलेल्या मशिनजवळ गेला. खाते क्रमांक टाकून त्याने मशिनमध्ये २५ हजार टाकल्याचे भासवले, मात्र प्रत्यक्षात त्याने ही रक्कम खात्यामध्ये भरलीच नाही.महानगर मुंबईमध्ये अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांच्या अडचणीचा, त्यांच्या एखाद्या श्रद्धा असलेल्या ठिकाणाच्या नावाचा उल्लेख करुन नागरिकांच्या दागिने आणि एकूणच ऐवजावर डल्ला मारला जातो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती न सांगणे, आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.