
यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेली वीस वर्षीय युवती १ मार्चला लहान बहिणीचा दहावीचा पेपर असल्याने कारंजा तालुक्यातील रामनगरला आली. दुपारच्या सुमारास परीक्षा केंद्राबाहेर उभ्या ऑटोचालकाला रामनगर फाटा येथे जायचे असल्याचे सांगितले.त्याने होकार देताच दोघीही ऑटोमध्ये बसल्या. यापूर्वीच ऑटोमध्ये एक व्यक्ती बसलेला होता. ऑटो रामनगर फाट्याच्या दिशेने निघाला पण, वाटेतच थांबला. याला दोघी बहिणींनी विरोध केला असता चालकाने ऑटो वेगाने पळविला. त्यामुळे घाबरलेल्या दोघींनीही ऑटोमधून उड्या मारत मुख्य रस्त्यावर आल्या. यानंतर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर ऑटोचालक व त्याच्या साथीदारावर कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

