पारोळा शहरातील भुईकोट किल्ल्यालगतच्या अतिक्रमण धारकांवर अन्याय होवु देणार नाही…. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांची भेटी दरम्यान दिले आश्वासन..पारोळा शहरातील भुईकोट किल्ल्याचा सभोवतालील असलेले १२० पक्की घर व २१५ दुकानांचा अतिक्रमण काढण्याबाबत विषय सध्या शहरात चर्चेत आहे.
या अतिक्रमण धारकांनी जेव्हा माझी भेट घेतली त्यावेळी देखील मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असुन चिंता करण्याचे कारण नसल्याचे आश्वासित केले होते.आज त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांची या अतिक्रमण संदर्भात भेट घेतली.
तसेच अतिक्रमण काढल्यास ३३५ कुटुंबांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत लेखी निवेदन देवुन सदरची पार्श्वभूमी लक्षात आणुन दिली. यावर मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी दखल घेत या अतिक्रमण धारक कुटुंबांवर अन्याय होवु देणार नसल्याचे ठोस आश्वासित केले.









