नंदुरबार ग्रामीण भागातील खंडित विज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता, शिवसेना उबाठा पक्षामार्फत टाळे ठोको आंदोलन व ठिय्या आंदोलन करण्यात आले, मात्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांचा लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्हयातील ग्रामिण भागात खंडीत विज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता, शिवसेना उबाठा पक्षामार्फत आज साडेअकरा वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड समोरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात, टाळे ठोको व ठिय्या आंदोलन जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, यावेळी पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते, यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन आंदोलन केले दरम्यान कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर, त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विजेच्या पुरवठा वारंवार खंडित होतो, तो पूर्ववत सुरू व्हावा या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत तीन मार्च रोजी वीज वितरण कंपनीचा विभागीय कार्यालयात टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.

त्या संदर्भात वीज वितरण कंपनी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले होते, आंदोलनाच्या वेळी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, महानगरप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी, जिल्हा सचिव दिनेश भोये, सोशल मीडिया प्रमुख आनंदा पाटील, युवा सेना शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, उपतालुकाप्रमुख बापू राजपूत, उपतालुकाप्रमुख सुनील पवार, शहर उपप्रमुख एजाज काझी, उपतालुकाप्रमुख निंबा पाटील, संतोष पाटील, उत्तम भुरसे, कैलास बिल मंगल मायले, गणेशपाटील, संतोष पाटील, आकाश वळवी, आभेसिंग वळवी, गुड्डू राठोड उपस्थित होते, नंदुरबार जिल्हयातील ग्रामिण भागात 8 तास खंडीत विजपुरवठा होत असल्याने शेतकरी व ग्रामीण नागरिक त्रस्त असुन, रात्रन दिवस विज पुरवठा सुरळीत होत नाही, तसेच नंदुरबार जिल्हयातील ग्रामिण भागात विज पुरवठा MIDC नसतांना देखील दिवसा विज खंडीत करुन, रात्र पाळीसाठी शेतीला पाणी भरण्यास विज सोडली जाते, फडणवीस सरकारने सत्त्येत आल्यावर 24 तास विज पुरवठा करण्यात येईल रात्री पाळीस एकही शेतकऱ्याला शेतावर पाणी भरण्यासाठी वेळ येणार नाही, मात्र आश्वासनाचे पालन होत नसल्याने व 8 तासातही खंडीत विज पुरवठा पुरविला जात असल्याने व कर्मचाऱ्यांचा अरेरावी व मुजोरी यांना जनता व शेतकरी वर्ग त्रस्त आहेत, विज पुरवठा सुरळीत नसल्या कारणाने शेतीलाल सिंचन करणे त्रासदायक आहे, पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही, रात्री हिस्त्र प्राण्याचा उपद्रव अश्यातच शेतकऱ्यांना जिव धोक्यात घालुन पिकांना रात्रीच्यावेळीस, पाणी देण्यासाठी जावे लागते, सदरील परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचा कोणीही वाली नसल्याचे शेतकऱ्यांचा जिवही व पिकही धोक्यात आलेले आहेत, यात आधीच ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात असल्या कारणाने नंदुरबार उबाठा गटा मार्फत, वेळोवेळी आंदोलने करुन निवेदनाव्दारे समज देवुनही विज वितरण कंपनीच्या अधिकारी दुर्लक्ष करीत होते, त्यामुळे नंदुरबार मार्केट यार्ड समोरी विज वितरण कार्यालय येथे टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला होता, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गजानन पाटील यांनी शिवसेना उबाठा पक्षामार्फत, देण्यात आलेल्या निवेदनासंदर्भात लेखी आश्वासन दिलेलवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहे, शिवसेना उबाठा पक्षामार्फत वीज वितरण कंपनी कार्यालयात आंदोलन करण्यात आले, त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक युनूस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासह विविध घोषणा शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी दिल्या.









