औरंगजेब उत्तम प्रशासक म्हणताच एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले, ‘औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा…’

विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी सोमवारी विधानभवन आवारात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता.’ यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फटकारले आहे.विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी सोमवारी विधानभवन आवारात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता.’ आझमींच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणायचे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी २४ टक्के होता, त्यामुळे इंग्रज भारताकडे आकर्षित झाले आणि ते भारतात आले, असे वक्तव्य अबू आझमींनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशभक्ती दाखवण्याऱ्याविरोधात बोलणं हा देशद्रोह आहे. ,’ असे म्हणत शिंदेंनी फटकारले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करुन ४० दिवस त्यांचा छळ करुन त्यांना निर्घृणपणे मारण्यात आलं हा क्रुरकर्मा म्हणजे औरंगजेब आहे.’ शिंदे संभाजी महाराजांचा इतिहास गिरवत पुढे म्हणाले, ‘आपण छावा सिनेमा पाहिला तर अंगावर काटे उभे राहतील. औरंगजेबाचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शोर्य दाखवलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माभिमान बाळगला. त्यांनी धर्माभिमान, राष्ट्राभिमान आणि देशाभिमान सोडला नाही. अशा धर्मवीर संभाजी महाराजांना क्रुरपणे मारलं त्याचं उदात्तीकरण करणं अतिशय दुर्दैवी आहे.’शिंदेंनी असेही नमूद केले की, ‘अशा वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. संभाजी महाराजांनी देशासाठी प्राण अर्पण केला आहे. तर औरंगजेबाचं उत्तम प्रशासक म्हणून कौतुक करणं हे महापाप आहे. अबू आझमींनी माफी मागावी, देशभक्ती दाखवण्याऱ्यावर बोलणं हा देशद्रोह आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी २४ टक्के होता, त्यामुळे इंग्रज भारताकडे आकर्षित झाले आणि ते भारतात आले, असे वक्तव्य अबू आझमींनी केले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती, असेही अबू आझमी म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.