चाकणमध्ये मध्यरात्री धुमश्चक्री, दरोडेखोराने डीसीपीच्या छातीवर कोयता चालवला, एपीआयच्या खांद्यावर वार.

गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेव्हा पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता.दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बचावासाठी पोलीस उपायुक्तांनीसुद्धा गोळीबार केल्यानं एक आरोपी जखमी झाला. यात चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झालेत. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली.

गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेव्हा पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार अशी खबर पोलिसांना मिळाली होती. मग डीसीपी पवारांनी एपीआय जराडसह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी मंदिर परिसरात दोघे दबा धरुन बसल्याचं लक्षात आलं. मग त्या परिसरात सापळा रचण्यात आला.

रात्री सव्वा बाराच्या सुमारास स्वतः डीसीपी आणि एपीआय दोन दरोडेखोरांच्या दिशेने निघाले, या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र दोघांनी पळून जाण्याचं धाडस स्वीकारलं, तेव्हा डीसीपी आणि एपीआय पुढं सरसावले.दोघांपैकी एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. बचावासाठी डीसीपींनी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर ही दरोडेखोराने डिसीपींवर कोयत्याने वार केला, डीसीपी पवार थोडं मागे हटले. मात्र वार चुकवू शकले नाहीत, त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. डीसीपी पवार रक्तबंबाळ झाले. अशात त्यांनी एक गोळी झाडली, ती दरोडेखोराने चुकवली. मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढं आले, त्याने त्यांच्यावर ही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. मग जखमी अवस्थेत असलेल्या डिसीपींनी दुसरी गोळी थेट पायावर झाडली, यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आलं, दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं. जवळपास वीस मिनिटं पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डिसीपींना छातीवर पाच टाके पडलेत. ते थोडक्यात बचवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जराड यांना ही मोठा इजा झालेली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जखमी दरोडेखोरावर उपचार सुरुयेत तर अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे. डीसीपी पवार, एपीआय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या. दसऱ्यादिवशी याचं टोळीनं एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकत, पोलिसावर हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात बहुळ गावात एका घरावर दरोडा टाकला, त्यावेळी त्या कुटुंबातील पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. आता पुढचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना डीसीपी पवार, एपीआय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.