मॅट्रिमोनिअल साईटवरुन कर्जतच्या महिलेला तब्बल सात लाखांना गंडा; नाशिकच्या महाठगाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपी विरोधात इतर ठिकाणी देखील गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.मॅट्रिमोनी वेबसाईटवर महिलांना आकर्षित करत लग्न करण्याचा बहाणा देत 7 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या महाठगाला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतीक संजय देवरे (37) असे या आरोपीचे नाव असून तो नाशिक येथे राहणारा आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथे राहणारा आरोपी प्रतीक संजय देवरे या कर्जत येथील 37 वर्षीय महिलेशी जीवनसाथी डॉट कॉम या विवाह वेबसाईटवरून ओळख केली.

यानंतर प्रतीकने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून येथे बिअर शॉप विकत घ्यायचे असल्याचे सांगितले.बिअर शॉपसाठी पैशांची गरज असल्याचे भासवून संबंधित महिलेच्या बँक ऑफ बडोदा,  बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एकूण सात लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. तर 90 हजार रुपये रोख स्वरूपात घेत एकूण 7 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. महिलेला जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आले तेव्हा मात्र या महिलेने कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला.

या प्रकरणी 6 फेब्रुवारी 2025 रोजी कर्जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्ती कुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील येरुनकर यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी प्रतीक देवरेला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आरोपीने  विविध महिलांना जीवनसाथी आणि इतर विवाह वेबसाईट्सद्वारे फसवले आहे. तो विवाह वेबसाईट्सद्वारे महिलांशी जवळीक साधत त्यांचा विश्वास संपादन करत होता. यानंतर महिलांची आर्थिक फसवणूक करत होता. त्यामुळे प्रतीक देवरे विरोधात इतर ठिकाणी देखील गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.