‘सगळेजन तिचाच लाड करतात’; नालासोपाऱ्यात चिमुकल्याचं 5 वर्षांच्या बहिणीसोबत भयंकर कृत्य, जंगलातील ते दृश्य पाहून पोलिसही हादरले.

नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, 13 वर्षांच्या अल्पवयीन आतेभावाने आपल्याच 5 वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केली आहे. रविवारी पाहटे चार वाजता या चिमुरडीचा मृतदेह एका जंगलात सापडला आहे, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेचा उलगडा झाला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, घरातील सर्वजण तिचाच लाड करतात, माझा कोणी लाड करत नाही. हा राग मनात धरून, नालासोपार्‍यात एका 5 वर्षांच्या चिमुरडीची 13 वर्षाच्या अल्पवयीन आतेभावाने निर्घृणपणे हत्या केली असल्याची धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. रविवारी पहाटे 4 वाजता एका जंगलात या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्या मुळे हत्येचा उलगडा झाला असून, याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिद्राखातून खान (वय 5) असे हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व श्रीराम नगर परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तर 13 वर्षांचा आरोपी ही त्यांच्या घराच्या शेजारीच राहत होता.घरातील सर्वचजण तिचा लाड करतात आणि त्याचा कोणी लाड करत नाही, हा राग मनात धरून अल्पवयीन आतेभावानेच आपल्या मामेबहिणीची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून, घटनेबाबत तपासाला सुरुवात केली आहे.दरम्यान अवघ्या तेरा वर्षांच्या मुलानं आपल्याच मामेबहिणीची हत्या केली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसणार नाही, मात्र या मुलानं या चिमुरडीची हत्या केली, ही घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे, या चिमुरडीचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे. केवळ तिचाच सर्वजण लाड करतात आणि आपला कोणीच लाड करत नाही, या भावनेतून त्याने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.