आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नंतर आई वडिलांनाही मारहाण; पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या.

स्वारगेटच्या घटनेने राज्य हादरलं आहे. ही घटना ताजी असताना नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला. इतकेच नाही तर या कृत्यास विरोध करणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.राज्यात महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. स्वारगेटच्या घटनेने राज्य हादरलं आहे. ही घटना ताजी असताना नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला. इतकेच नाही तर या कृत्यास विरोध करणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

त्यानंतर पुन्हा बोलत का नाहीस, म्हणून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी तीन आरोपींवर अॅट्रासिटीसह पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. नरसीमधील शामनगर येथील संशयित आरोपी अरवाज शेख हा गेल्या काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलीशी छेडछाड करत होता. तू माझ्याशी बोलत का नाहीस म्हणून घर ते शाळेपर्यंत पाठलागही करायचा. यानंतर पेपर सुटल्यानंतर ज्यूस सेंटरमध्ये बसून फोटो काढून लैंगिक छळ देखील केला आहे. या प्रकाराचा पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीस जाब विचारला. तेव्हा आरोपीच्या आई व बहिणीने मुलीच्या आई वडिलांस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

तर एवढ्यावरच न थांबता, तू माझ्याशी न बोलल्यास तोंडावर अॅसिड टाकून जिवंत मरण्याची धमकीही आरोपीने दिली आहे. यासंदर्भात पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली.मुलीच्या तक्रारीची अरबाज अजिज शेख, ममताज, तब्बु (रा. सर्व शामनगर नरसी ता. नायगाव) यांच्याविरोधात रामतीर्थ पोलिसांत पोस्को, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आणि मारहाण करणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास सोमवारी बिलोली येथील सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेने नायगावात संताप व्यक्त केला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.