दत्ता गाडे आक्रमक, गळा दाबण्याची धमकी, तरुणीला ‘कोलकाता केस’ आठवली; म्हणाली, दादा मला जीवे मारु नका

गेल्या वर्षात कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना तरुणीला माहिती होती. गाडेने तरुणीला जबरदस्ती केल्यानंतर तिच्यावर मानसिक दबाव निर्माण झाला.स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रतिकार केल्यानंतर नराधम आणखी आक्रमक झाल्याचे पाहून भेदरलेल्या तरुणीने ‘दादा, मला जिवे मारू नको,’ अशी विनवणी केली होती. आरोपी दत्तात्रय गाडे याने जोरात गळा दाबून तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या मंगळवारी पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलातकार झाल्याची घटना समोर आली आहे.

बलात्काराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणीच्या भूमिकेवर विविध स्तरावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. खुद्द गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही ‘बलात्कार प्रकरणात संघर्ष झाला नाही. तरुणीने आरडाओरडा केला नाही. अन्यथा घटना लवकरच उघडकीस आली असती,’ असे विधान केले होते. मात्र, पोलिसांनी केलेला तपास आणि तरुणीच्या जबाबातून अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे.आरोपीने तरुणीची दिशाभूल करून तिला ‘सोलापूर-पुणे’ या शिवशाही बसमध्ये चढायला भाग पाडले आणि त्याने बसमध्ये चढून दरवाजा लावून घेतला. आरोपीने तरुणीशी अश्लील वर्तन केल्यानंतर तरुणीने त्यास प्रतिकार केला होता. मात्र, आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी देऊ तिचा गळा दाबल्याची माहिती समोर आली आहे.तरुणी एका रुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरी करते. गेल्या वर्षात कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना तरुणीला माहिती होती.

गाडेने तरुणीला जबरदस्ती केल्यानंतर तिच्यावर मानसिक दबाव निर्माण झाला. त्यातून तिने आरोपीला ‘जिवे मारू नका’ अशी विनवणी केली.बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी शिवशाही बसचा आढावा घेतला. ती वातानुकूलित बस होती. त्यामुळे बसला खिडक्या नव्हत्या. पोलिसांनी या बसमधून मोठ्याने ओरडून पाहिले असता, बाहेर आवाज आला नाही, असे दिसून आले होते. त्यामुळे तरुणीने आरडाओरडा केला असेल तरीही ते बाहेर ऐकू आले नाही. तसेच, अत्याचार होत असताना तरुणी मोठमोठ्याने रडत होती, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.