संशयित आरोपी एकूण पाच यांना वरील मुद्देमालासह ताब्यात
मिळालेल्या गुप्त माहितीवरून वन परिक्षेत्र चाळीसगाव अंतर्गत जुणपानी नियातक्षेत्रातील मौजे शिवापूर मालकी गट न 105 मध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष, मांस , जिवंत पक्षी वन्यप्राण्यांना पकडण्याचे साहित्य जाळे व पिंजरे ई. असल्याच्या माहितीवरून मौका स्थळी गेले असता संशयित आरोपी एकूण पाच यांना वरील मुद्देमालासह ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.सदर संयुक्त कारवाई श्रीमती शीतल नगराळे वन परिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव प्रा. जळगाव वन विभाग जळगाव, सचिन शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी कन्नड वन्यजीव, महेन्द्र रहाटवाळ वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव पाटणादेवी वन्यजीव विभाग संभाजीनगर, राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव, पोलीस विभाग चाळीसगाव , सर्व वन कर्मचारी यांनी प्रवीण ए. उपवनसंरक्षक जळगाव वन विभाग जळगाव, मोहन नाईकवाडी विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग संभाजीनगर, अमोल पंडित सहाय्यक वन संरक्षक ( रोहयो व वन्यजीव) जळगाव वन विभाग जळगाव, श्री विशाल लोंढे सहाय्यक वनसंरक्षक कन्नड वन्यजीव विभाग संभाजीनगर यांच्या मार्गदर्शाखाली पार पाडली. वन विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की वन अपराधांवाबत माहिती/ संशयित व्यक्ती आढळल्यास टोल फ्री क्रमांक 1926 वर त्वरीत संपर्क करावा.










