कॉलेज तरुणांचा कारनामा उघडकीस, गुंगीच्या औषधांसह १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची मोठी कारवाई.

दुचाकीस्वार संशयित कल्पेश गोकुळ जगदाळे (वय २०), अजय श्रावण कोळी (वय २०, दोघे रा. खर्दे बुद्रुक ता. शिरपूर) यांना अडवून त्याची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडील बॉक्समध्ये ३५ हजार ८३२ रूपये किंमतीच्या गुंगीकारक औषधांसह गोळ्या आढळून आल्या.गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने धुळ्यात आलेल्या शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील दोघा महाविद्यालयीन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील संतोषी माता चौकात पकडले.

त्यांच्याकडून ३५ हजार ८३२ रुपये किमतीची औषधे, मोटारसायकलसह एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये शिरपूर शहरातील एका शैक्षणीक संस्थेच्या लिपिकाचाही समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.पथकाने शहरातील संतोषी माता चौकातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून औषधांच्या साठ्यासह मोबाईल, दुचाकी असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच शिरपूरातील अर्थे गावातील एका माध्यमिक विद्यालयातील फार्मसीचे शिक्षण घेतलेला लिपीक महेश ईशी नामक कर्मचारी हा गेल्या अनेक वर्षापासून गुंगीकारक औषधांचा साठा आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन दोघांकडून २० हजार रूपये किंमतीच्या मोबाईलसह २० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार ८३२ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

अटक करण्यात आलेल्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुचाकीस्वार संशयित कल्पेश गोकुळ जगदाळे (वय २०), अजय श्रावण कोळी (वय २०, दोघे रा. खर्दे बुद्रुक ता. शिरपूर) यांना अडवून त्याची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडील बॉक्समध्ये ३५ हजार ८३२ रूपये किंमतीच्या गुंगीकारक औषधांसह गोळ्या आढळून आल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमित माळी, औषध निरीक्षक किशोर देशमुख, असई संजय पाटील, पोहेकॉ. मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, हेमंत पाटील यांनी केली आहे. सदर प्रकरणाची अधिक चौकशी पोलिस करत आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.