पथकातील सदस्यांनी सांगितले की, भेटीदरम्यान पथकाला इमारत परिसरात, दालनाबाहेर कॉपी आढळून आले. पथकाने केंद्रात प्रवेश करताच. आणि पथक आल्याची कल्पना येताच काही मिनीटातच परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षाव केला. यामध्ये परीक्षा उपयोगी साहित्य, गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्ससह इतर साहित्य अशा कॉप्यांचा समावेश होता. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करून परीक्षा कक्षात सोडण्याचे स्पष्ट असताना मोठ्या प्रमाणात कॉपी कशी, असाा प्रश्न उपस्थित होतो आहे.बारावी परीक्षेत गुरुवारी जीवशास्त्र विषयाच्या पेपरला माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. पथकाने परीक्षा केंद्रात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षाव केल्याचा प्रकार समोर आला. परीक्षा कक्षाबाहेर कॉप्यांचा खच जमा झाला. यानंतर तातडीने संस्थाचालकांसह केंद्रसंचालकांसह १५ पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.पिंपळगाव वळण येथील सामुदायिक कॉपीचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा आज कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला. बारावी परीक्षेत २७ फेब्रुवारी रोजी जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय येथील केंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या पथकाने अचानक भेट दिली.
पथकातील सदस्यांनी सांगितले की, भेटीदरम्यान पथकाला इमारत परिसरात, दालनाबाहेर कॉपी आढळून आले. पथकाने केंद्रात प्रवेश करताच. आणि पथक आल्याची कल्पना येताच काही मिनीटातच परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षाव केला. यामध्ये परीक्षा उपयोगी साहित्य, गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्ससह इतर साहित्य अशा कॉप्यांचा समावेश होता. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करून परीक्षा कक्षात सोडण्याचे स्पष्ट असताना मोठ्या प्रमाणात कॉपी कशी, असाा प्रश्न उपस्थित होतो आहे. विद्यार्थी तपासणीत अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरु केली. या प्रकरणी संस्था अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.कॉपीमुक्त् परीक्षेबाबत निर्देश दिल्यानंतरही गैरप्रकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांच्या अभिलेखांची तपासणी करण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात येते.केंद्र संचालक, पर्यवेक्षक तसेच अध्यक्ष, सचिव यांनी परीक्षा संचलन कर्तव्य सूची मधील नमूद कर्तव्यात कसूर केली. तसेच शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकारणी गटशिक्षणाधिकारी यांना तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी एका विद्यार्थ्यावर ही कॉपी गैरमार्ग प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अश्विनी लाठकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर.









