रामनारायण गुप्ता आणि पीडित महिला हे जीन्स पॅन्ट खिसे पॅकिंग व्यवसायात भागीदार होते. गेल्या सहा वर्षांपासून आरोपी महिलेवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर राम गुप्ताने तिच्याशी जवळीक वाढवली. अगोदर त्याने महिलेला गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.यानंतर महिलेने जेव्हा लग्नाचा आग्रह धरला, तेव्हा आरोपीने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. हेच नाही तर त्याने महिलेला धमक्या देखील दिल्या. पुढे महिला लग्नासाठी आग्रह करत असल्याने त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. शेवटी महिलेने पोलिसात धाव घेतली. अखेर महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

