स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास पारितोषिक, पुणे पोलिसांची मोठी घोषणा.

पुण्यातील स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आरोपीला पकडण्यासाठी १३ पथके शोध घेत असून पोलिसांनी आता मोठी घोषणा केलीये. आरोपीबद्दल धक्कादायक खुलासे होताना देखील दिसत आहेत.पुण्यातील स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने खळबळ निर्माण झाली असून महिला आणि मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. स्वारगेट बस आगारात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये या मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही मुलगी पुण्यात नोकरीला असून ती स्वारगेटवरून आपल्या मुळगावी फलटणला निघाली होती. नराधम दत्तात्रय गाडे याने मुलीला ताई म्हटल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला.

आरोपीने पीडित मुलीवर दोनदा अत्याचार केला, ही धक्कादायक माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आलीये.मुलीवर अत्याचार करून आरोपी दत्तात्रय गाडेने घटनास्थळावरून पळ काढला. त्याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय. १३ पथकांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड याठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातोय. त्याच्या कुटुंबियातील अनेकांची काल चौकशी पोलिसांकडून करण्यात आलीये. आरोपीबद्दल धक्कादायक माहिती ही पुढे येताना दिसत आहे. पोलिस आरोपीच्या शोधात असून त्याला पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत.पोलिसांकडून आरोपीला पकडून देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना पुणे पोलिसांच्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी म्हटले की, जो आरोपीला पकडून देईल त्याला १ लाख रूपये दिले जाणार आहेत.

ही घटना घडल्यानंतर पोलिस हे दिवसरात्र काम करत आहेत. आरोपीने मास्क लावल्याने त्याचा चेहरा हा दिसत नव्हता. मात्र, पाऊण तासांमध्येच आरोपीची ओळख पटवण्यात आली.आरोपी लवकरच पकडला जाईल, कारण तो बसस्थानकांमध्ये फिरतो. तो लपत असेल म्हणून तो अजून सापडला नसावा, असे पुणे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी म्हटले आहे. पुण्यातील या अत्याचाराच्या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. पुण्यातील स्वारगेट बसस्थान सुरक्षेत म्हणून बघितले जायचे. मात्र, मुलीवर शिवशाही बसमध्येच अत्याचार झाल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.