पोलिसांनी वेशांतर करून केले १९ किलोचा गांजा जप्त : एकाला अटक.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे अनेक कारवाई होत असतांना आता कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोस्टे हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासुन सपोनि, निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता.सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चार दिवसापासून अपयश मिळाले होते. परंतु दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि, निलेश राजपुत पोउनि.

दत्तु खुळे, पोहेकों.नंदलाल परदेशी, पोकों समाधान तोंडे, पोकॉलहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन त्याची मोटारसायकल पाठलाग करुन थांबवली. त्याचे मोटारसायकल वरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकींग टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळुन आले ते फोडुन चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणले.

सदर पथकाने संशयीत इसम नामे अजय रविंद्र पवार वय २७ रा. सोनबडर्डी ता. एरंडोल याला ताब्यात घेवून त्याचेकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमंती चा मुद्देमाल जप्त केला. पोहेकों नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे (एनडीपीएस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस मा. न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस अधिक्षक. महेश्वर रेड्डी सर यांच्या आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सपोनि.निलेश राजपुत पोउनि.दत्तु खुळे, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना अकील मुजावर, पोना.किरण गाडीलोहार, पोना.नरेद्र गजरे, पोकों.समाधान तोंडे, पोकॉ लहु हटकर अशांनी कारवाई केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. निलेश राजपुत हे करीत आहेत.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.