दिल्ली विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा! ‘आप’चे २१ आमदार तीन दिवसांसाठी निलंबित, काय कारण?

 ​​विधानसभा अध्यक्ष वीजेंद्र गुप्ता यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या पक्षाच्या सर्व २१ आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी निलंबित केले.दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय व सचिवालयातून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिकारक भगतसिंग यांची छायाचित्रे हटवून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावल्याच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांनी मंगळवारी विधानसभेत नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या अभिभाषणादरम्यान प्रचंड गदारोळ केला.विधानसभा अध्यक्ष वीजेंद्र गुप्ता यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या पक्षाच्या सर्व २१ आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी निलंबित केले.

त्यावेळी सभागृहातच नसल्याने अमानतुल्ला खान हे एकमेव आमदार या निलंबनास्त्रातून बचावले. दिल्ली विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यावर ज्येष्ठ भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांची विधानसभाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.त्यानंतर नायब राज्यपाल सक्सेना यांचे अभिभाषण सुरू केले. त्याक्षणी विरोधी पक्षनेत्या आतिशी व ‘आप’च्या आमदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर आतिशी यांना मार्शल करवी बाहेर काढण्यात आले, तर ‘आप’ आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मंत्री प्रवेश साहिबसिंह यांनी मांडला व आमदार अभय वर्मा यांनी याला अनुमोदन दिले.

हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मान्य झालाआम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत आणलेल्या मद्यधोरणानंतर २०२१-२०२२मध्ये सरकारचे २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले, असा ठपका भारताचे नियंत्रक व महापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात ठेवण्यात आला आहे. ‘या मद्यधोरणानंतर दिल्लीत एकावर एक बाटली मोफत, या धोरणाने विकले गेलेले मद्य अत्यंत वाईट दर्जाचे होते. या घोटाळ्यातून एकप्रकारे दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता’, असेही अहवालात म्हटले आहे. या अहवालावरून भाजप आणि ‘आप’ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.