पालिका निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयात आता ४ मार्चला होणार सुनावणी.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी मंगळवारी पुन्हा पुढे ढकलण्यात आली.विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकहाती विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची चाचपणी महायुतीच्या घटक पक्षांकडून सुरू असली तरी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (दि. २५) होत असलेली सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी ४ मार्च रोजी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख पडत असल्यामुळे राज्यातील प्रलंबित असलेल्या नाशिकसह २५ महापालिका व डझनभर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मुहूर्त पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.

या सुनावणीकडे लक्ष ठेवून असलेल्या इच्छुकांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. दरम्यान, मार्चमध्ये निवडणुकांना हिरवा कंदील मिळाला तरी, या निवडणुका आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींसाठी राजकीय आरक्षण, नगरसेवकांची संख्या, प्रभाग रचना अशा विविध मुद्द्यांवरून न्यायालयात दाखल झालेल्या अनेक याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

जवळपास दीड वर्षापासून या याचिका प्रलंबित आहेत. याआधी २२ जानेवारीला या वर्षातील पहिलीच सुनावणी होणार होती. आता ४ मार्चची तारीख देण्यात आली आहे. पुढच्या मंगळवारी याबाबत निकाल न लागल्यास व ‘जैसे थे’ स्थिती कायम राहिल्यास जूनपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे कठीण आहे असे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले. मार्चमध्ये होणाऱ्या सुनावणीत न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी अनुमती दिली, तर सर्वप्रथम मतदार यादी निश्चितीचा कार्यक्रम होईल. मतदार यादी जाहीर करून हरकती व सुनावणीची प्रक्रिया होईल. जर नवीन प्रभागरचना करायची असेल, तर सीमेमध्ये काही तुरळक बदल होतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन महिने जातील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.