जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी समिती नंदुरबार मध्ये दाखल.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण व केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी समिती गठीत करण्यात आली असून चौकशी समिती आज नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून माहिती जाणून घेत डॉ वर्षा लहाडे प्रकरणाची चौकशी केली .सदर चौकशी समिती मध्ये आरोग्यसेवा नाशिक येथील उपसंचालक डॉ कपिल आहेर,सहाय्यक उपसंचालक डॉ योगेश चित्ते,डॉ प्रशांत पाटील,पुणे येथील डॉ सदानंद काळे,याच्या सह 15 सदसिय टीम चौकशी साठी नंदुरबार येथे आली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना( मेग्मो संघटना) ,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना तसेच विविध संघटनानी चौकशी समितीची भेट घेत कारवाही करण्याची मागणी केली.तसेच विविध आदिवासी संघटनांनी यावेळी चौकशी समितीच्याअधिकारीशी भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती देत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या भ्रष्टाचार कश्या प्रकारे सुरू आहे याची माहिती देत कारवाही करण्याची मागणी केली. यावेळी चौकशी समिती तर्फे सांगण्यात आले की संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून माहिती वरिष्ठ स्तरावर देण्यात येईल.यात दोषी आढळल्यास कारवाही करण्यात येईल असेचौकशी समिती कडून सांगण्यात आले .
यावेळी बैठकीला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी, जितेंद्र टी बागुल केंद्रीय संस्थापक तथा अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना, रकेश वळवी बिरसा आर्मि नवापूर तालुका अध्यक्ष, श्रीमती मालती डी वळवी सामाजिक कार्यकत्या, डॉ सुनिल गावीत , पंकज वळवी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, गुलाब एस गावीत नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना, शरद एस पाडवी नंदुरबार जिल्हा सदस्य वैद्यकीय अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, जरमनसिंग पाडवी व परिचारिका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनीषा वळवी उपस्थित होते…..









