घाटावर गप्पा मारता-मारता पतीने अचानक चाकू काढला आणि…

सांगलीच्या सरकारी घाटावर एक धक्कादायक घटना घडली. तेथे एका व्यक्ती आपल्या पत्नीसोबत गप्पा मारत बसला होता. मात्र अचानक त्याने चाकू काढला आणि..राज्यात सध्या गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्था काही उरली आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच आता सांगलीमध्ये एक भयानक गुन्हा घडल्याचे उघड झाले आहे. सांगलीतील सरकारी घाटावर पती-पत्नी असं एक जोडपं गप्पा मारत बसलं होतं, मात्र त्याचदरम्यान असं काही घडलं ज्यामुळे सर्वच हादरले. पत्नीशी गप्पा मारत असतानाचा पतीने टाकू काढला आणि त्याच चाकून पत्नीचा गळा चिरून तिचा निर्घृणपणे खून केला. प्रियांका चव्हाण असे या मयत महिलेचे नाव असून या खुनानंतर हल्लेखोर पतीने पलायन केले आहे. हत्येच्या या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवत पुढील तपास सुरू केला.

पती पत्नीच्या वादातून खुनाची ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रियांका जाकाप्पा चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून ती सांगलीवाडी येथे राहणारी होती. तर जाकाप्पा सोमनाथ चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पती जाकाप्पा हा घटनेपूर्वी बबळेश्वर काकटगी कर्नाटक येथे रहात होता तर पत्नी प्रियांका ही सांगली वाडी येथे आपल्या आईकडे रहात होती. ती सांगलीतीलच एका साडीच्या दुकानात काम करत होती. घटनेच्या दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पती जाकाप्पा चव्हाण आणि पत्नी प्रियांका ही सरकारी घाटावर बोलत बसले होते.यावेळी त्यांच्यात काही मुद्यावरून वाद झाला आणि त्या वादामुळे संतापलेल्या पतीने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियांका हिचा गळा चिरला. या घटनेनंतर हल्लेखोर पतीने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. मयत प्रियांका ही सांगलीतील एका साडी दुकानात कामाला होती तर पती कर्नाटक येथे त्याच्या गावी रहात होता. घरगुती कारणातून हा पतीने पत्नीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक विमला एम, पोलिस निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसानी धाव घेतली. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.