आपदा मित्रांच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान;जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक.

आपदा मित्रांच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान;जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक. आपत्ती व्यवस्थापन कार्यात आपले रोजगार सांभाळून सेवा देणाऱ्या आपदा मित्र आणि वन्यजीव संस्थेच्या टीमने ममुराबाद रोड येथील प्रजापत नगरमध्ये एका घरगुती मांजराच्या पिलाला जीवदान दिले.गेल्या आठ दिवसांपासून वैष्णवी पंडित यांच्या घराजवळील विहिरीत एक मांजर अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच आपदा मित्र आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.

वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, सदस्य गणेश सपकाळे, राजेश सोनवणे आणि संरक्षण संस्थेचे खुशाल पंडित यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले.विहीर खोल असल्याने बचाव कार्य कठीण होते. विशेषतः मांजर एका कपारीत लपल्यामुळे तिला बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर, गणेश सपकाळे यांनी हॅन्ड ग्लोजच्या मदतीने मांजराला सुरक्षितरित्या वर काढले. बाहेर येताच मांजराने उडी मारून पळ काढली, मात्र ती सुखरूप असल्याची खात्री करून मदतकार्य पूर्ण करण्यात आले.वन्यजीव संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील हा संवेदनशील आणि तत्परतेने केलेला प्रयत्नाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.