जरांगेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, घरात घुसून महिलेला शिवीगाळ करत मारहाण.

बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला धडक दिली. या घटनेनंतर काही वेळ वाद निर्माण झाला आणि प्रकरण शांत झाले. मात्र, रात्री परत महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करण्याचा प्रकार पुढे आलाय. आता या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.मनोज जरांगे पाटील हे काल बीडच्या दाैऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मस्साजोगला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यासोबतच त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा देखील केली.

सये सोयऱ्यांचा निर्णय येत्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याचा दावाही जरांगे यांनी केला. जरांगे हे बीडच्या दाैऱ्यावर असताना एक घटना घडली आणि त्यानंतर आता गुन्हा देखील दाखल झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.जरांगेंच्या ताफ्यात गंगाधर काळकुटे यांची गाडी होती आणि या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. ही घटना पाटोदा तालुक्यातील कचारवाडी गावानजीक घडली होती. यात दुचाकीवरील एक महिला आणि तिचा मुलगा धडकेनंतर खाली पडले. यावेळी शाब्दिक चकमक झाली आणि वाद तिथेच थांबला. मात्र, रात्री त्याच महिलेच्या घरात घुसून आमच्या ताफ्यातील गाडीला का अडवलेस म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.हेच नाही तर महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

ही घटना बीडच्या संभाजीनगर भागात घडली. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आता हे तीन हल्लेखोर कोण होते? याचा शोध पोलीस घेत आहेत. बीड जिल्हा काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप केली जात आहेत. पोलिस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. हेच नाही तर सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मनोज जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना दिसले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.