भर बाजारात दिवसाढवळ्या तरुणीवर चाकू हल्ला, प्रियकरानेच केला कानावर वार, परिसरात खळबळ.

पीडित मुलगी परस्थुआ बाजारात खरेदीसाठी आली होती. यादरम्यान, महात्मा गांधी पुलाखाली, आरोपीने अचानक तीच्यावर चाकूने हल्ला केला. आणि तीचा कान कापला. हल्ल्यानंतर बाजारात गोंधळाचे वातावरण दिसून आले. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली असून, नागरिकांकडून बाजारपेठेत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे. शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) भरदिवसा बाजारात एका तरुणाने धारदार चाकूने वार करत एका मुलीचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक कले असून, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील परसाथुआ पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

शुक्रवारी एका तरुणाने धारदार चाकूने एका मुलीचा कान कापला. जखमी मुलीला उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच डायल ११२ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आणि तपास सुरू केला. सुरुवातीच्या चौकशीत, मुलीने सांगितले की एक तरुण तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. आणि तिने त्यास प्रतिकार केला तेव्हा त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला.परंतु मुलीच्या बोलण्यात संशय जाणवल्याने पोलिसांनी मुलीची सखोल चौकशी केली तेव्हा तिने आरोपी तरुणाचे नाव रिंकू कुमार असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी शिवसागर पोलीस स्टेशन परिसरातील पेबंदी गावातून आरोपीला अटक केली. पोलिस तपासात ही घटना प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.

आणि पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.पोलिस कर्मचारी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने कारवाई केली. आणि आरोपीला अटक केली. पोलिस कर्मचारी मनोज यादव म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. मुलीचा जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. या घटनेमागील खरी कारणे शोधण्यासाठी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.वास्तविक, पीडित मुलगी परस्थुआ बाजारात खरेदीसाठी आली होती. यादरम्यान, महात्मा गांधी पुलाखाली, आरोपीने अचानक तीच्यावर चाकूने हल्ला केला. आणि तीचा कान कापला. हल्ल्यानंतर बाजारात गोंधळाचे वातावरण दिसून आले. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली असून, नागरिकांकडून बाजारपेठेत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.