येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दर्पणकार, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी बी वाघ यांनी केले. तत्पूर्वी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण, प्र.प्राचार्य एम ए मराठे व उपस्थितांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार तथा माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ होते.

यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याशी संबंधित विषयांवर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. तद्नंतर प्र. प्राचार्य एम ए मराठे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, बाळशास्त्री हे वृत्तपत्राचे जनक असून त्यांनी दर्पण वृत्तपत्राची स्थापना करून सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना मराठी पत्रकारितेचे पितामह व दर्पणकार म्हणून संबोधले जाते. त्याचप्रमाणे आपल्या निःपक्ष व निर्भिड पत्रकारितेने लोकशाहीचा चौथा स्तंभ अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी सजग पत्रकारितेच्या माध्यमातून केले असल्याचे श्री. मराठे यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य नवनीत चव्हाण यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याशी संबंधित माहिती दिलीय. यावेळी एस एन खरे, एन आर कापडी मॅम, एस सी भरते मॅम, ऋतू राठोड मॅम, भूषण रानवे, सतिष पाटील, विठ्ठल पाटील, शांताराम जाधव, संतोष धनगर, एस आर चव्हाण, आर ए मोरे, लोकेश चावरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक नेरकर तर आभार डी एन परदेशी यांनी मानले.









