एकनाथ शिंदेंनंतर भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी, पत्रात आक्षेपार्ह भाषा.

बुलढाण्यात भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी आली. एकनाथ शिंदे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता श्वेता महाले यांना धमकी मिळालीये. धमकीच्या पत्राने खळबळ उडाली असून पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपाच्या एका महिला आमदाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले (BJP MLA Shweta Mahale) यांना थेट पत्राच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. हैराण करणारे म्हणजे श्वेता महाले यांच्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र पाठवण्यात आलंय. श्वेता महाले या पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचेही माहिती मिळतंय.

आमदार श्वेता महाले यांना फक्त जीवे मारण्याची धमकीच नाही तर पत्रात अतिशय खालची भाषा देखील वापरली आहे. श्वेता महाले यांना हे पत्र कोणी पाठवले आणि त्यांच्या निवासस्थानापर्यंत हे कसे पोहोचले याबद्दल अधिक माहिती ही मिळू शकली नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांना बुलढाण्यातील देऊळगावच्या मही येथूनच धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. पोलिसांनी मही येथून दोन जणांना अटक केली.श्वेता महाले दुपारच्या वेळी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत चिखली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आले. श्वेता महाले या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली.श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून राजकिय सतत धमकीचे ईमेल आणि पत्र पाठवण्याच्या प्रकरणात मोठी वाढ झालीये. आता तर थेट राजकिय नेते मंडळींनाच धमकी मिळत आहे. श्वेता महाले यांच्या तक्रारीनंतर पोलिस तपासाला सुरूवात करतील. एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीनंतर आरोपींना अवघ्या काही तासांमध्ये पकडण्यात पोलिसांना यश आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.