अजितदादांचे २ मंत्री रडारवर, एकाला कोर्टात शिक्षा; फडणवीसांनी राजीनामे घ्यावे, संजय राऊत कडाडले.

 कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यावरुन संजय राऊतांनी महायुती सरकारला सुनावलं आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  हे दिल्लीत होत आहे. यावेळी संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटनाचं स्थान अन्यत्र नेण्यास परवानगी का दिली हा प्रश्न आहे. पंडित जवाहरलाल नेहरु हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते.

ज्या तालकटोरा मैदानात हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून गेले आहेत. मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला तिथे जाणं का टाळलं. आमचे साहित्यिक, कवी, ग्रंथ विक्रेते यांच्यापासून मोदींना काय धोका आहे. ते साधे लोक आहेत. पण हा पंतप्रधान कार्यालयाचा निर्णय आहे, अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली.शरद पवार हे आमच्या सर्वांचे नेते आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही पवार साहेबांचा सन्मान करतो, त्यांच्याशी कोणताही वाद नाही.तसेच, सुरेश धस यांच्यापूर्वी अनेकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा  मागितला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एका मंत्र्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री रडारवर आहे. नैतिकनपोटी कोणतीही खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवारांनी नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे. इतका मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. अंजली दमानिय, सुरेश धस आरोप करत आहेत. माणिक कोकाटे यांच्यासंदर्भात तर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. विधानसभा अध्यक्षांवर काय सोडताय, ते निष्पक्ष आहेत का? आमच्या १२ आमदारांच्या मुद्यावेळी आम्ही पाहिलं, ते काय निष्पक्ष राहून निर्णय घेणार आहेत का?सुरेश धस यांच्यावर कोणी आता विश्वास ठेवेल असं वाटत नाही. त्यांचा बुरखा फाटला आहे. तरीही ते अजूनही मैदानात लढण्याचं नाटक करत असतील तर त्यांनी ते करत राहावं. त्यांनी ज्याप्रकारे मुंडेंची भेट घेतली. ज्याक्षणी मुंडे आले तेव्हाच त्यांनी बाहेर यायला हवं होतं आणि सांगायला हवं होतं की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला पण मी खंबीर आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.