लग्न समारंभातून घरी जाताना काळ आडवा आला, एकाच बाईकवरील पाचही तरुणांचा भीषण अपघात, चार दगावले, एक अत्यवस्थ.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी १७ वर्षीय आशिष याला मृत घोषित केले. इतर चार तरुण, १५ वर्षीय हिमांशू, २२ वर्षीय राहुल, दौलतपूर येथील रहिवासी १८ वर्षीय रोहितचा मृत्यू झाला. तर, १५ वर्षीय प्राणशु गंभीर जखमी झाला आहे. आणि त्याला सैफई पीजीआयमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर पाचही जणांच्या कुटुंबांमध्ये आक्रोश पसरला आहे.एकाच मोटारसायकलवरुन जाणाऱ्या पाच तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच, तर तीन जणांचा रुग्णालयात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला असून एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. उत्तर प्रदेशातील इटावा येथे हा मोठा रस्ता अपघात झाला. उसराहर पोलीस स्टेशन हद्दीतील दौलतपूर गावाजवळ, एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार पाच तरुणांना धडक दिली.

या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तीन तरुणांना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. सैफई पीजीआयमध्ये एका तरुणावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी १७ वर्षीय आशिष याला मृत घोषित केले. इतर चार तरुण, १५ वर्षीय हिमांशू, २२ वर्षीय राहुल, दौलतपूर येथील रहिवासी १८ वर्षीय रोहितचा मृत्यू झाला. तर, १५ वर्षीय प्राणशु गंभीर जखमी झाला आहे. आणि त्याला सैफई पीजीआयमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर पाचही जणांच्या कुटुंबांमध्ये आक्रोश पसरला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण उत्तर प्रदेशातील उसराहारमधील एका गेस्ट हाऊसमधून लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथून परतताना हा अपघात झाला. गुरुवारी रात्री उशिरा १० वाजण्याच्या सुमारास पाच तरुण दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, रुद्रपूरजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांना उपचारासाठी पाठवले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी चार तरुणांना मृत घोषित केले. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवण्यात आले आहेत.वरिष्ठ पोलिस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, पाच तरुण मोटारसायकलवरून लग्न समारंभातून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. चौघांचेही मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. ज्या वाहनामुळे हा अपघात झाला त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.