मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला मोठे आवाहन, म्हणाले, जे काम हातात घेतो ते कधीच अर्धवट सोडत नाही.

नुकताच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले. एकजूट राहा असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी आपली आरक्षणाची लढाई आपल्याला पूर्ण जिंकायची आहे, असेही म्हटले. जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा देताना दिसत आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटीलहे काही दिवसांपूर्वीच आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे हे मराठी समाजाच्या आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. अनेक दिवस त्यांनी उपोषण केले.

विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे म्हटले होते. अनेकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका करतानाही जरांगे दिसले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोपही केली. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या मागे आपण उभे असल्याचे त्यांनी म्हटले. आता नुकताच जरांगे यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील हे धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी लातूरमधील मुरूडमध्ये धावती भेट घेतली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपली आरक्षणाची लढाई आपल्याला पूर्ण जिंकायची आहे. मी जे काम हातात घेतो ते काम कधीच मी अर्धवट सोडत नाही. कायम एकजूट राहायचं आणि व्यसनापासून दूर राहा. आता ही आरक्षणाची लढाई थोडीशी शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या काळात ही मराठा समाजाने एकजूट राहा. राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणीही मागे हटू नका. आपली लढाई ताकतीने लढायची आहे.सरपंच संतोष देशमुख  यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केले. हेच नाही तर त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी धनंजय मुंडे  हे वाल्मिक कराडसोबत मला भेटण्यासाठी आले होते. मला जर माहिती असते अगोदर यांचे कारनामे तर यांना उभे पण केले नसते, असे म्हणताना जरांगे हे दिसले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतरही जरांगे यांनी संताप व्यक्त केला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.