स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता ‘घाणेरडा’ खेळ, मॅनेजरनेच दिली टीप, पोलिसांनीही बरोबर साधली वेळ, परिसरात खळबळ.

हे प्रकरण बरेलीतील एका उच्चभ्रू वस्ती, प्रेम नगरचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी येथे बुद्ध स्पा सेंटर उघडण्यात आले. रात्रीच्या अंधारात मुलींना मोठ्या, महागड्या, आलिशान गाड्यांमध्ये आणले जात असे. बरेलीसह जवळपासच्या जिल्ह्यांतील लोक या स्पा सेंटरमध्ये येत असत.स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका तरुणीने पोलिसांना याची माहिती दिली. तिला त्या स्पा सेंटरवर खूप चांगल्या पगारावर व्यवस्थापकाची नोकरी देऊ करण्यात आली होती. तरुणीने दिलेल्या माहितीवरुन पोलिस स्वतः ग्राहकांच्या वेशात स्पा सेंटरमध्ये पोहोचले. या स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाइल मुलींना ओलीस म्हणून आणले जात असल्याचे उघडकीस आले.

या मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.हे प्रकरण बरेलीतील एका उच्चभ्रू वस्ती, प्रेम नगरचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी येथे बुद्ध स्पा सेंटर उघडण्यात आले. रात्रीच्या अंधारात मुलींना मोठ्या, महागड्या, आलिशान गाड्यांमध्ये आणले जात असे. बरेलीसह जवळपासच्या जिल्ह्यांतील लोक या स्पा सेंटरमध्ये येत असत.बरेली शहरातील एक महिला या स्पा सेंटर टोळीच्या तावडीत अडकली. एक उच्चशिक्षित मुलगी नोकरीच्या शोधात या स्पा सेंटरमध्ये आल्यानंतर तिला मोठ्या पगारावर मॅनेजर म्हणून नोकरीची ऑफर देण्यात आली. नोकरीत रुजू झाल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून ती थक्क झाली. दुसऱ्याच दिवसापासून तिने ड्युटीवर जाणे बंद केले. आणि थेट बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांच्याकडे जाऊन तक्रार केली. मुलीने जे उघड केले ते ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटले.तरुणीच्या तक्रारीनंतर, एसएसपींनी एक मजबूत पोलिस पथक तयार केले. जेव्हा पोलिस ग्राहकांच्या वेशात या स्पा सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा आतील दृश्य पाहून तेही थक्क झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरून तीन महिला आणि दोन पुरुषांसह पाच जणांना अटक केली. यामध्ये, हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी ज्योती या स्पा सेंटरची संचालिका आहे. मुरादाबाद जिल्ह्यातील रहिवासी रेखा या स्पा सेंटरची व्यवस्थापक आहे.बरेली येथील रहिवासी सुमन, या स्पा सेंटरमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून तैनात आहे. या तिन्ही महिलांचे जाळे हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि नेपाळपर्यंत पसरलेले आहे. बरेली येथील रहिवासी असलेल्या साहिल आणि रोहितच्या मदतीने या महिला शिक्षित मुलींना फसवून वेश्याव्यवसायात ढकलत असत. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि औषधे देखील जप्त केली आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.