उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका ४ वर्षांच्या मुलीनं तिच्या आईच्या हत्येचं गूढ उकललं आहे. पंचवटी शिव परिवार वसाहतीत राहणाऱ्या २७ वर्षीय सोनाली बुधेलियाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला.उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका ४ वर्षांच्या मुलीनं तिच्या आईच्या हत्येचं गूढ उकललं आहे. पंचवटी शिव परिवार वसाहतीत राहणाऱ्या २७ वर्षीय सोनाली बुधेलियाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. सोनालीनं आत्महत्या केल्याचा दावा तिचा पती संदीप बुधेलियानं केला. पण बुधेलिया दाम्पत्याच्या ४ वर्षीनं मुलीनं काढलेल्या एका चित्रानं रहस्यमयी घटनेमागचं सत्य समोर आलं.४ वर्षांच्या मुलीनं एका साध्या कागदावर चित्र काढलं. वडील आईला कशा प्रकारे मारतात, त्याचं चित्र चिमुरडीनं काढलं. त्यानंतर तिनं पोलिसांना जबाब दिला. संदीपनं सोनालीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिला लटकवलं, याचा उलगडा चिमुरडीच्या जबाबातून झाला. सोनालीचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी पती आणि सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरु केला.










