विधवा महिलेशी लग्न करायचा आणि…; मुंबईतील अट्टल चोराला पुण्यातून अटक.

मुंबईतील अंधेरीत एका ५१ वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेशी लग्न करून तिचे दागिने चोरण्याची घटना घडली. प्रमोद नाईक नावाच्या या आरोपीने पुण्यातील एका सोन्याच्या कंपनीला दागिने विकण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात एका विधवा महिलेशी लग्न करुन तिचे दागिने घेऊन पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद नाईक (51) असे या आरोपीचे नाव आहे.

दिंडोशी पोलिसांनी घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी पुण्यातून अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद नाईक विधवा महिलेशी लग्न करुन मुंबईहून पळ काढला होता. त्याने तिचे सोन्याचे दागिने चोरले होते. यानंतर त्याने चोरीचे सोन्याचे दागिने पुण्यातील एका सोन्याच्या कर्ज कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्याची अपेक्षित किंमत मिळाली नाही. त्यामुळे तो दुसऱ्या खरेदीदाराचा शोध घेत होता. यादरम्यान पोलीस हे आरोपीचा शोध घेत होते.पोलीस तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी पुण्यातील बाणेर परिसरात आहे. तिथून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अंदाजे २९.५ तोळे सोने, १.५ किलो चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम जप्त केली. प्रमोद नाईकने हा सर्व मुद्देमाल त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मालाड येथील घरातून चोरला होता. प्रमोदने त्यांच्या दुसऱ्या पत्नीला सांगितले होते की त्याची पहिली पत्नी आणि दोन मुले यांचा कोविडदरम्यान मृत्यू झाला.

मात्र प्रत्यक्षात ते अजूनही जिवंत आहेत आणि मुंबईतील गिरगाव येथे राहतात. लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.प्रमोद नाईकवर मालाडमधील एका इव्हेंट कंपनीत काम करत होता. या ठिकाणी त्याने फसवणूक केली होती. त्याने त्याच्या खात्यात २५ लाख रुपये फसवणूक करुन ट्रान्सफर करुन घेतले होते, असा आरोप त्याच्यावर होता. तपासादरम्यान असे आढळून आले की प्रमोद नाईक ४५-५५ वयोगटातील विधवांची मॅट्रिमोनियल साइट्सवरुन माहिती काढायचा. लग्नाच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करायचा. गेल्या महिन्यात एका ५० वर्षीय महिलेला त्याने फसवले होते. प्रमोद नाईक चार ते पाच महिलांच्या संपर्कात होता आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांना अशाच प्रकारे फसवण्याचा त्याचा हेतू होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..