प्रवासी गाढ झोपेत, २५ जणांसह निघालेल्या बसला समृद्धी महामार्गावर अपघात, चालकाची चूक जीवावर.

 बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला असून एक प्रवाशी ठार झाला आहे. अपघातात 7 ते 8 प्रवाशी गंभीर जखमी, तर 15 ते 20 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा झोपेची डुलकी आल्याने ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जातो.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवाशी ठार झाला असून 7 ते 8 प्रवाशी गंभीर जखमी तर 15 ते 20 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. पुण्यावरून नागपूरला जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटून किंवा झोपेची डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स पलटी होऊन हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव जवळ समृद्धी महामार्गावर सकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.पुणे वरून नागपुर कडे जात असलेल्या MH 12 HG 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्ग चॅनेलनं 215 वर नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझा पासून मालेगावकडे अंदाजे 5 किमीवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, सात ते आठ प्रवाशी गंभीर जखमी आणि 15 ते 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सात ते आठ रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले आहेत.अपघाताची माहिती मिळताच वाशिम मंगरूळपीर मतदार संघाचे आमदार श्याम खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मंगरूळपीर च्या तहसीलदार शितल बंडगर, ठाणेदार सुधाकर आडे, समाजसेवक पवन राठी, सचिन राणे यांनी घटनास्थळी पोहोचून सर्वधर्म संस्थापकलीन संस्थेचे श्याम सवई व गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भेलांडे , बाळू राठोड संत गाडगेबाबा रुग्णवाहिकेचे शुभम खोड नवनिर्माण रुग्णवाहिकेचे विनोद खोड व लोकेशन कारंजा 108 लोकेशन मालेगाव 108 लोकेशन वनोजा 108 शिवनी नांदगाव खंडेश्वर तसेच मंगरूळपीर मानोरा शेलुबाजार येथील उपकेंद्राच्या देखील रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाल्या होत्या. यावेळी कारंजा अग्निशामक दल, अग्निशामक दल मालेगाव ह्या देखील घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना तात्काळ अकोला, मालेगाव कारंजा आणि शेलुबाजार येथे उपचारार्थ हलविण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत मृतकाची ओळख पटली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.