शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या प्राप्त अर्जातील प्राथमिक छाननीतील सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या प्राप्त अर्जातील   प्राथमिक छाननीतील सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन जळगाव : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूंना व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यातील प्रतिष्ठेचा असणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याकरीता जेष्ठ क्रीडा महर्षि जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्श करणाऱ्यासाठी  उत्कर्ष क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), साहसी उपक्रम पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कार व  महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येतो.
क्रीडा व युवक सेवा विभागाचा शासन निर्णय दि. 29 डिसेंबर, 2023 व दि. 25 जानेवारी, 2024  नूसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारचे सुधारीत नियमावली, 2023 मध्ये लागू करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाच्या नियमावलीस अधिन राहून सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा क्षेत्रातील पात्र असलेले खेळाडू/व्यक्ती यांच्याकडून दि. 14 ते 26 जानेवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक छाननी करण्यात आली असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते उपरोक्त नमूद शासन निर्णयानूसार एकूण गुणांकनासह दि. 15 ते 18 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत सूचना व हरकतीं असतील अश्या खेळाडू/व्यक्तींनी (https://shivchhatrapatiawards.com) या लिंकवर प्रसिद्ध करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
तसेच सदरचा प्राथमिक छाननी अहवाल हा अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व गुणांकनाबाबत आक्षेपीत हरकतींनुसार बदल करण्यात येईल. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू/व्यक्ती यांनी आपल्या सूचना व आक्षेपीत हरकती उपरोक्त नमूद ऑनलाईन पद्धतीने . 15 ते 18 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत सादर केल्यांनतर तसा  अहवाल पुन:श्च  प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे  सुधीर मोरे, सहसंचालक क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.