गावठी कटयासह दोघांना घातल्या बेडया
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पोस्टे ला हजर असतांना आम्हाला आमचे गोपनीय बातमी दारमार्फतीने बातमी तसेच एक गावढी गटटयासह फोटो प्राप्त झाला असुन एक इसम नामे गणेश हिमंत कोळी रा. मोहाडी हा त्याचे जवळ अवैध अग्निशस्त्र (देशी कट्टा) जवळ बाळगुन नेरी नाका परिसरात फिरत आहे सदरची माहिती मीळताच आम्ही पो.उप.निरी चंद्रकांत धनके यांना सोबत पोलीस स्टाफ घेवुन जावुन सदर इसमावर तात्काळ कारवाई कराने बाबत आदेश दिले. सदर आदेशावरुन पोउपनि चंद्रकांत धनके व सोबत, पोकों / १२२ अनिल कांबळे, पो. कॉ/४९० मुकुंद गंगावणे पो.कॉ/२००१ विकी इंगळे, पो. कॉ/९३६ रविंद्र साबळे, पोकों / अमोल वंजारी असे नेरी नाका परीसरात रवाना होवुन एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याने पो.उप. निरीक्षक धनके यांना त्यांचे मोबाईल मध्ये प्राप्त असलेल्या फोटोवरुन खात्री करुन फोटोतील इसमास ओळखुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश हिमंत कोळी वय २३ वर्षे रा. मोहाडी, उमेश पार्क ता. जि. जळगाव मुळ रा. धानोरा ता. चोपडा जि. जळगाव असे सांगितले सदर आरोपीस त्याचे ताब्यातील गावठी कटया बाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असतांना त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने सांगीतले की काही दिवसा पुर्वी मी काढलेले माझा गावढी कटयासह फोटो व्हायरल झाला होतो त्यामुळे सदचा कटटा लपवुन ठेवणे करिता मी माझे मित्र नामे विनय जितेंद्र कोळी याचेकडे दिला असुन तो विनयने माझे समक्ष त्याचे शेतातील जनावराचे कुट्टी मध्ये लपवुन ठेवलेला आहे अशी माहिती सांगितली त्यानंतर पो.उप. निरी चंद्रकांत धनके व पोलीस स्टाफ सह विनय जितेद्र कोळी याचे मोहाडी शिवारातील उमेश पार्क जवळील शेतात जावुन तेथे हजर असलेल्या व्यक्तीस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विनय जितेंद्र कोळी वय ३४ वर्ष व्यवसाय शेती रा. मोहाडी ता.जि. जळगाव असे सांगीतले तसेच त्यास गणेश कोळी यांने दिलेल्या गावठी कट्टा बाबत विचारले असता त्याने सदचा कट्टा त्याचे गोठयातील कुटटीमधुन काढुन दिला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे. १०,०००/- रुपये किंतीचा एक स्टिलची बॉडी असलेले देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) ज्यावर

प्लॉस्टीकची काळ्या रंगाची ग्रीप असलेली त्यास स्टिलची एक मॅगझीन असलेले देशी पिस्तूल (कट्टा) जु.वा कि.अं.
सदर पिस्तूल (कट्टा) बाबत संशयीत इसम नामे गणेश कोळी व विनय कोळी यांना सदर पिस्तूलाचा परवाना आहे का अशी विचारपुस केली असता त्यांनी शस्र परवाना नसल्याचे सांगितल्याने पुढील कायदेशीर कारवाही करीता सदर देशी बनावटीचे पिस्तूल व दोघे इसम नामे- गणेश हिमंत कोळी, विनय जितेंद्र कोळी यांना ताब्यात घेवुन त्याचेवर पोकों / १२२ अनिल कांबळे यांचे फिर्यादी वरुन भारतीय शस्त्र अधीनयम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी. अपर पोलीस अधिक्षक अंकुश नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत सो यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आलेली आहे.










