प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत उपकेंद्र पिलखोड अंतर्गत गाव अलवाडी येथे जनरल महिला ग्रामसभेचे औचित्य साधून अलवाडी गावात महिला सभेत पिलखोड येथील आरोग्यसेविका सारिका हळदे यांनी उपस्थित गावातील महिलांना बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 या कायद्याबददल माहिती दिली. तसेच महिला व महिलांचे कायदे या बाबत सविस्तर माहिती ग्रामपंचायत अधिकारी सीमादेवी बेडसे यांनी महिला सबलीकरणाचे धोरण याबाबत उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले.

त्यात महिलांचे हक्क अधिकार हुंडा प्रतिबंधक कायदा 1961,तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया व सदर कायद्या अंतर्गत काय करावे या साठी विस्तृत माहिती सीमादेवी बेडसे यांनी दिली. व महिला संमती स्थापन करून सदर समितीत आरोग्यसेविका सारिका हळदे, सरपंच मनीषा पाटील ग्रामपंचायत अधिकारी सीमादेवी बेडसे, आशा सेविका बेबाबाई बिराढे, अंगणवाडी सेविका संगीता पाटील, स्वाती सूर्यवंशी, गत प्रवर्तक राजश्री पाटील. व गावातील बचत गट महिला तसेच उपस्थित महिला प्रतिनिधी यांची महिला समितीत निवळ करण्यात आली. ग्रामसभेचा शेवटी उपस्थित सर्व महिला यांना शिरसगाव येथील आरोग्य सहाय्यक हेमंत कुलकर्णी यांनी राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम बाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामसभेची सांगता एक शपथ बालविवाह निर्मूलन करण्याची म्हणून बालविवाह प्रतिबंधक अभियान प्रतिज्ञा पिलखोड येथील आरोग्य सेवक हेमंत पवार यांनी उपस्थित महिलांना शपथ दिली. सदर ग्रामसेभेस शिरसगाव वैद्यकीय अधिकारी सुजित भोसले यांचे देखील मोलाचे योगदान लाभले.









