जळगाव जिल्हा अनुसूचित जाती उपयोजनेत राज्यात अव्वल.

जळगाव जिल्हा अनुसूचित जाती उपयोजनेत राज्यात अव्वल. जळगाव  विशेष घटक योजनेअंतर्गत निधी वितरण आणि खर्चाच्या निकषांवर जळगाव जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2024-25 साठी 9300 लक्ष रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असून जिल्ह्याला 5580 लक्ष वाटप करण्यात आले आहेत, त्यापैकी 5398.70. लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तो प्राप्त तरतुदीचा 96.75% इतका आहे. या निकषांवर आधारित गुणांकनात जळगाव जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.

संयोजनात्मक नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी

सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेतील कामे प्रभावीपणे पार पाडण्यात जिल्हा प्रशासनाने उल्लेखनीय योगदान दिले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे हे यश जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, निधीच्या नियोजनबद्ध खर्चामुळे जिल्ह्याने हे यश मिळवले आहे. योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, त्याचा परिणाम राज्यस्तरीय क्रमवारीत दिसून आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.