चहा द्यायला बाजारात जात असताना भरधाव ट्रकने धडक दिली आणि त्यात या चहा विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.अकोला शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अपघातात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अशीच घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवीन किराणा मार्केटमध्ये घडली आहे. किराणा मार्केटमध्ये एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने, एका वयोवृद्ध चहा विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामदास श्रीराम रत्नाळे असं वयोवृद्ध इसमाच नाव आहे. ते चहा देण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.










