राज्यमंत्री पंकज भोयर यांची बारावीच्या परीक्षा केंद्रास भेट.

इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेगाव येथील  ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली. प्राचार्य मीनाक्षी बुरूंगले व पर्यवेक्षक शिवाजी निळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आशिष वाघ उपशिक्षणाधिकारी (मा), अनिल देवकर, उपशिक्षणाधिकारी (प्रा),गटशिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे, योगीराज फाउंडेशनचे सचिव डॉ. श्यामकुमार बुरूंगले, श्रीधर पाटील, अन्य अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही भेट दिली.पाहणीदरम्यान त्यांनी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती दिली. याशिवाय विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा द्यावी तसेच परीक्षा केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि पालकांनी कॉपीमुक्त अभियात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

  • Related Posts

    “शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर”

    “शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर” जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जिल्हा परिषदेच्या एका मुख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळलेल्या दोन कुत्रे सांभाळण्याची जबाबदारी शासकीय…

    गणेश विसर्जनानंतर विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम…

    गणेश विसर्जनानंतर विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम… जळगाव : शहराच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त असा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव राबवित आहे. गणेश विसर्जनानंतर ७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी सकाळी “स्वच्छ भारत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.