रावेर तालुक्यातील भामलवाडी येथे यज्ञेष पाटील या मुलाला सर्पदंश
रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी. रावेर तालुक्यातील भामलवाडी गावातील यज्ञेष मनोज पाटील वय ८ वर्ष या लहान मुलाला गावामध्ये खेळत असताना त्याला सापाने चावा घेतला.
आणि त्या मुलाला तात्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.आणि वेळीच उपचार झाल्याने मुलाचे प्राण वाचविण्यात डॉक्टराना यश आले. गावाला लागून हतनूर जलाशयाच्या बॅक वॉटर मधून सर्प, विंचू ,अशा प्रकारचे विषारी जीव गावात संचार करत असतात.काही दिवसा पूर्वी वाघाने एका शेतकऱ्याची बकरी त्याच्या घरासमोरच फस्त केली होती.गावातील दोन महिला बुडता बुडता वाचल्या होत्या.तरी अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी शासनाने गावाचे पुनर्वसन साठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी अपेक्षा गावकरी करीत आहे.









