माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे शाळेत दिंडी सोहळा.
रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी.
माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे या शाळेमध्ये पुरी, गोलवाडे, शिंगाडी,भामलवाडी.अशा चार गावातील मुले ,मुली शिक्षण घेत आहेत.आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.वारकऱ्यांच्या वेश भूषेतील लहान मुले मुली,पालखी मिरवणूक, आणि विठू नामाचा गजर,अशा वातावरणात चार ही गावांमध्ये दिंडी सोहळा रंगला. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांच्या असतो.पंढरीची वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक,सांस्कृतिक वैभव.हा भक्ती वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी पुरी गोलवाडे
विद्यालया तर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एरव्ही शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले मुली आज मात्र पांढरा कुर्ता आणि डोक्यावर टोपी कपाळी बुक्का,डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.विठ्ठल नामाची शाळा भरली ,शाळा शिकताना तहान भूक हरली.या अभंगा प्रमाने विठल रखुमाईच्या भक्तीत या वेळी ज्ञान मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरी नामाचा गजर झाला.हे बघून जणू खरच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.वारकरी दिंडी, वृक्ष दिंडी ,पर्यावरण दिंडी,अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते.आणि चार ही गावातील लोक या सुंदर ,भक्तिमय वातावरणात विठू नामाच्या गजरात तल्लीन झाले होते.या दिंडी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राहुल पाटील सर,शिवाजी पाटील ,विजय पाटील,अंबादास पाटील,सचिन कचरे, पंकज पाटील,उन्हाळे सर,अमोल पाटील ,सचिन पाटील सर,भैय्या पाटील भाऊसाहेब,मुकुंदा कोळी,भैय्या पाटील.आणि गावातील भजनी मंडळे,व वरिष्ठांनी सहकार्य केले.