पुण्यातील ब्रिजवर जोरदार धडक, गंभीर जखमी दुचाकीस्वाराला रिक्षा चालकाने रुग्णालयातही नेलं, पण…

डायस प्लॉट येथील उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.भरधाव कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना डेक्कन जिमखाना परिसरातील खंडुजीबाबा चौकात घडली. विनायक साहेबराव थेटे (वय ३०, भगवतीपूर, राहता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर डायस प्लॉट येथील उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातातही एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. एका रिक्षा चालकाने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेलेही, मात्र प्रशासनाने उपचारांना नकार दिल्याने त्यांना अन्यत्र हलवावे लागले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विनायक रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास खंडुजीबाबा चौकातून जात होते. त्या वेळी भरधाव कारने विनायक यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनायक यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करीत आहेत.दुसरीकडे, डायस प्लॉट येथील उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नेल्सन पॉल डिसोझा (वय ५०, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, कासारवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर जखमी डिसोझा यांना एका रिक्षाचालकाने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, संबंधित रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांना पुणे कँटॉन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डिसोझा हे एका फार्मा कंपनीत नोकरीस होते.डिसोझा यांना धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डिसोझा यांचा मुलगा गौरीश (वय १९) याने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार डिसोझा हे ३१ जानेवारीला दुपारी चारच्या सुमारास मार्केट यार्ड येथून निघाले होते. त्या वेळी डायस प्लॉट येथे उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीने डिसोझा यांच्यात्या वेळी तेथून जाणाऱ्या रिक्षाचालकाने डिसोझा यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्या रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर रिक्षाचालक त्यांना सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात घेऊन गेले. तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्वारगेट ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक शैलेश आलाटे तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.