फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेले, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; आईची नजर चुकवत चिमुकला गेला अन् आक्रित घडलं.

बदलापुरातील ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आईची नजर चुकवून चिमुकला काही मिनिटं बाजूला झाला आणि आक्रित घडलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नेरळ पूर्व परिसरात बदलापूर येथून आलेल्या चार वर्षीय चिमुरड्याचा स्विमिंग पूलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत झालेल्या चार वर्षीय मुलाचं नाव आयांश अभिजित निवाळकर असं असून तो आपल्या आईसोबत फिरण्यासाठी म्हणून नेरळ इथे आला होता. दरम्यान सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आयांश आपल्या आईचं लक्ष चुकवून स्विमिंग पुलाजवळ गेला. त्याचवेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास हा नेरळ पोलीस करत आहेत.

बदलापूर वेस्ट जवळील शनिमंदिर परिसरातील मनोहर निवास इमारतीत राहणारे निवाळकर हे चार वर्षीय आयांश मुलगा आणि आई असे फिरण्यासाठी आपल्या मैत्रिणींसोबत शनिवारी १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नेरळ इथे आले होते. निवाळकर आणि त्यांच्या मैत्रिणी या नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आशीर्वाद व्हिला या फार्महाऊसवरील बंगल्यात वस्तीला राहिले होते. त्यांच्या सोबत त्यांची लहान मुलं देखील होती. सर्व पाच महिला आणि एक व्यक्ती तसंच सोबत लहान पाच मुलं असा हा ग्रुप होता.दरम्यान, दुपारचं जेवण करून या महिला बंगल्याच्या टेरेसवर गप्पागोष्टी करण्यासाठी बसले होते. त्यावेळी लहान मुलं बाजूला खेळत होती. यावेळी निवाळकर यांचा चार वर्षीय मुलगा आयांश आईची नजर चुकवत बंगल्यामध्ये असणाऱ्या स्विमिंग पूलजवळ गेला. तो तिथे पाण्यात पडला. ही घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. जवळपास १५ मिनीटं हा मुलगा पाण्यात पडून होता. मुलगा कुठे दिसत नसल्याने सर्वजण मुलाचा शोध घेत होते. त्यावेळी मुलगा स्विमिंग पूलच्या पाण्यात पडल्याचं दिसलं आणि आईने एकाच टाहो फोडला.चार वर्षीय मुलाला तात्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं असता, पाण्यात बुडाल्याने मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचं नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थित डॉक्टरांनी सांगितलं.एकूणच स्विमिंग पूल परिसरात कुठलेही सुरक्षा फार्म हाऊस मालकाने ठेवली नसल्याचं समोर आलं आहे. निवाळकर कुटुंबात ९ वर्षाने मुलगा जन्माला आला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. यावेळी नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक युवराज साळुंखे हे करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.